उमरगा :– येथील औद्योगिक परिसरातील एस.एच.के.केमटेक इंडस्ट्रीज एल एल पी कंपनी व दाळींब ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने दाळींब येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मका पीक संवर्धन व्यवस्थापन व मका पिकाचे भरघोस उत्पादनासाठी परिसरातील शेतकऱ्यांकरीता परिसंवादाचे दि.11 जून रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब बिराजदार बँकेचे तथा साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश बिराजदार तर मुख्य मार्गदर्शक म्हणून सिनियर कृषितज्ज्ञ डॉ बी. डी. जडे, जैन ईरेगिशन लिमिटेड जळगाव, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा बी . रितापुरे , महाराष्ट्र ग्रामीण बँक चे यशवंत वानखेडे , प्रशांत जैसवाल , सरपंच परशुराम देवकते , समाजसेवक बाबा जाफरी , सुनील कोचेटा , नीलम अजमेरा , प्रथमेश कोचेटा , श्रेयांसह अजमेरा , सुनील होनराव जनरल मॅनेजर एस एच के कंपनी व सर्व कर्मचारी व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे मनोगत व प्रमुख मार्गदर्शकाचे मका पिका विषयी सविस्तर मार्गदर्शन , हेक्टरी मिळणारे उत्पादन, नफा , पूर्वतयारी , संगोपन या विषयी सविस्तर मार्गदर्शन झाले अध्यक्षीय सामोरोपं करत असताना सुरेश बिराजदार यांनी मका पिकातुन उत्पादन व शिल्लक राहिल्या धाटा पासून निर्माण होणारे नॅच्युरल ग्यास व त्यातून होणार नफा या वर सविस्तर मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी सरपंच परशुराम देवकाते , उपसरपंच ओमप्रकाश टिकांबरे, असिफ शिलार , बालाजी सातपुते ,इरफान झागिरदार , ग्रामपंचायत कर्मचारी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.