उमरगा :– तालुक्यातील कोरेगाववाडी येथील शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग येथे दि 12 रोजी परदेशामध्ये नर्सिंग नोकरी करिअरसंधी खूप असून यावरती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे होते. प्रमुख पाहुणे म्हणून करिअर कोच जावेद अख्तर, करिअर कोच अमोल कुलकर्णी,संस्थेचे सचिव डॉ.विजय बेडदुर्गे संस्थेचे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे उपस्थित होते.यावेळी जावेद अख्तर यांनी परदेशातील नर्सेसचा तुटवडा, तेथील मानधन परदेशामध्ये नर्सेसला करिअर साठी सुवर्णसंधी असून नर्सेसनी या करिअरसंधी बनवावी असे मुलांना मार्गदर्शन केले. करिअर कोच अमोल कुलकर्णी यांनी जर्मनीतील इंटरशिप प्रोग्राम, जर्मनी भाषा व तेथील आकर्षक मानधन, हमीशीर कायमस्वरूपी नोकरी, जर्मनीमध्ये नर्सेसचा खूप तुटवडा असून, भारतीय नर्सेसची खूप मागणी आहे, जगभरामध्ये आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाचे असून नर्सेस चा अमुलाग्र वाटा आहे, करिअर संधी निवडत असताना, आपण नर्सिंग केल्यानंतर परदेशामध्ये सुद्धा आपले करिअर बनवू शकता याबद्दल करिअर कोच अमोल कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मोलाची मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी,प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अभिजीत पाटील यांनी केले.
Home आरोग्य व शिक्षण शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कोरेगाववाडी येथे परदेशात करिअर संधी बद्दल बायोब्राईट कंपनीमार्फत...