जेवळी व परिसरात कारहुन्नवी (कर्नाटक बैलपोळा) सण पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरा 

0
102

लोहारा :–  तालुक्यातील जेवळी व परिसरात बुधवारी (ता.११) कारहुन्नवी (कर्नाटक बैलपोळा) सण पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या घरा पुढे पशुधनांची पारंपरिक पध्दतीने सहकुटुंब विधिवत पुजा केली. यावर्षी सुरुवातीच्या नक्षत्रातच चांगला पाऊस होत शिवारात पेरणी योग्य ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात आनंदी वातावरण आहे लोहारा तालुका हा कर्नाटक सीमेलगत असून येथे विरशैव समाज मोठ्या संख्यानी आहे. यामुळे या परिसरात अनेक कानडी सण साजरी केले जातात. त्या पैकीच खरीप पेरणीत दरवर्षी या भागात जेष्ठ पौर्णिमे दिवशी कारहुन्नवी हा सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या मध्यमातून शेतकरी आपल्यासोबत काबाडकष्ट करणाऱ्या पशुधनाचे कृतज्ञता व्यक्त करतात. या वर्षीही कारहुन्नवी निमित्त येथे आदल्या दिवशी मंगळवारी (ता.१०) बैलांची खांदेमळनी करुण प्रथेनुसार खिचडी व ज्वरीची कणसे खाऊ घालण्यात आली. तर बुधवारी (ता.११) कारहुन्नवीच्या दिवशी पशुपालकांकडून आपल्या गायी, म्हशी, बैल आदी पशुधनाला धुऊन- पुसून, स्वच्छ करुण त्यांच्या अंगावर रंगी बेरंगी गोंड्यांचे बशींग, झूल, कासरे, शिंगोटे, गळ्यात घागर माळे, शिंगाना रंग, अंगाला पीवडी, चमेली आदी लावून सजविण्यात आले. या नंतर शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या घरा पुढे पशुधनांची पारंपरिक पध्दतीने सहकुटुंब विधिवत पुजा केली. यावेळी पशुधनाला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. पशुधनाचा जयजयकार व चंगभलचा घोष करण्यात कारहुन्नवी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. येथील प्रथेप्रमाणे दुपारी पशुधनाची सहवाध्य मिरवणूक काढून शेतकऱ्याने आपापल्या पशुधनाला ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here