कानेगाव येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त नेत्र तपासणी महाशिबिर 

0
35

लोहारा  :– तालुक्यातील कानेगाव येथील राजमाता अहिल्यादेवी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सभागृहात दि.12 जून रोजी मोफत नेत्र तपासणी महाशिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 217 रूग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.स.माजी सभापती बळीराम लव्हळे होते तर कार्यक्रमाचे उदघाटन तहसीलदार रणजितसिंह कोळेकर व पो.नि.ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड.श्रीकृष्ण सोलंनकर, डॉ.हेमंत श्रीगीरे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत आडसुळे, सचिव उषाताई अडसुळे (शेंडगे), कानेगावचे सरपंच नामदेव लोंभे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सायली आय स्पेशालिस्ट, धाराशिवच्या नेत्रतज्ज्ञांनी या शिबिरात नेत्र तपासणी केली. कार्यक्रमासाठी ह.भ.प.पंडित महाराज, ॲड. सत्यवान आडसुळे, राघवेंद्र गावडे, धिरज कदम, जलिंदर सोनटकके, डॉ.समाधान शिंदे, रघुविर घोडके, सुरेश वाघमोडे शुभम महानवर, सनातन भालकडे, लिंबराज क्षिरसागर, संताराम क्षिरसागर, धनराज घोडके उमरगा त्र्यबंक कदम, भीमराव घोडके, व्यंकट लव्हळे, पांडूरंग लोभे, परमेश्वर चंदनशिवे, रावण क्षिरसागर, मारुती सोनटकके, दयानंद अडसुळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक .सत्यवान अडसुळे व सुत्रसंचालन प्रशांत अडसुळे यांनी केले तर आभार महेश अडसुळे यांनी मांनले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here