उमरगा :– शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक बनसोडे यांची कन्या अदिती बनसोडे हिने मेडिकलसाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये तिने ४३५ गुण मिळवून यश मिळवले आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल संविधान विचार मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये महादेव पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, सोहेल इनामदार, प्रवीण कोराळे, नितीन कांबळे, प्रकाश सोनकांबळे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याचा मानस —- अदिती ने पूर्वी नीट परीक्षेत आलेले अपयश पुसून अभ्यासात सातत्य ठेवून यश मिळवले. यंदाच्या नीट च्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवल्याने त्याच्यावर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढे जाऊन नामांकित कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस. ची पदवी संपादित करून ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करण्याचा त्याचा मानस आहे.