सुरवसे परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना साहित्य वाटप 

0
52

उमरगा :– तालुक्यातील काळा निंबाळा पश्चिम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाशाळा येथे गावचे मूळ रहिवासी असणारे परंतु सद्यस्थितीमध्ये पुणे येथे वास्तव्यास असलेले देविदास लक्ष्मणराव सुरवसे व त्यांच्या पत्नी छबुबाई देविदास सुरवसे यांनी  दि. 16 रोजी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वही कंपास व खाऊचा बॉक्स सप्रेम भेट म्हणून दिल्या शिक्षण प्रेमाचा अतिशय अविरत वारसा चालवणारे सन्माननीय देविदासजी हे पुण्यातील दापोडी येथे सरस्वती शिक्षण अनाथ आश्रम संस्था चालवतात ही संस्था त्यांच्या स्वर्गीय मातोश्री सरुबाई त्यांच्या नावामुळे त्यांनी संस्थेस सरस्वती असे नाव दिले आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ते गेले आहेत परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व विद्यार्थी प्रेमापोटी त्यांनी ही भेटवस्तू दिली व अतिशय मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले शाळेच्या वतीने त्यांचे शतशः आभार मानले .सदर कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच ,उपसरपंच ,तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तसेच पंचायत समिती उमरगा येथील विस्ताराधिकारी साहेब गावातील ग्रामपंचायतचे अधिकारी , सरस्वती अनाथ शिक्षण संस्था दापोडी पुणे यांच्यावतीने शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळ लिंबाळा पश्चिम व पूर्व या ठिकाणी करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक देविदास लक्ष्मण सुरवसे व संस्थेचे सचिव छबुबाई देवदास सुरवसे व काळा लिंबाळा येथील सरपंच सतपाल सूर्यवंशी उपसरपंच रेवन कारभारी व आरोग्य विभागातील विस्तार अधिकारी तोजन जोजनसर ग्रामसेवक डोणगा वे काळ लिंबाळा पश्चिम चे मुख्याध्यापक बिराजदार सर काय लिंबाचे पूर्वचे मुख्याध्यापक गोबरे सर गावातील तंटामुक्ती अध्यक्ष दयानंद स्वामी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर दासमे यावेळी शिक्षक तर कर्मचारी क्रांतीज्योत मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर सुरवसे गावातील प्रतिष्ठित नागरिक दिगंबर पाटील रमेश टी कांबरे. योगेश सुरवसे यांची उपस्थिती होतीतसेच अनेक शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here