पेठसांगवी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

0
144

उमरगा :– तालुक्यातील पेठ सांगवी येथील जि.प.प्रा.शाळा येथे दि. 16 जून रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करुन इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ,खाऊ, पाठ्यपुस्तक, गणवेश,बुट व सॉक्स तसेच उपस्थित पालकांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी केंद्रप्रमुख अशोक सुतार यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शाळा, पालक व गावकऱ्यांनी मिळून विद्यार्थ्यांची प्रगती करण्याचे आवाहन केले. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष उमेश सुरवसे यांनी पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन शिक्षकांच्या मदतीने आपल्या पाल्याचा विकास घडवून आणावा असे सांगितले.कार्यक्रमासाठी नारंगवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक सुतार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष उमेश सुरवसे, सदस्य निळकंठ राठोड,शिक्षणतज्ञ संजय पाटील, ग्रामपंचायत समिती सदस्य गिरमल दलाल, मोठ्या संख्येने पालक, नागरिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.कल्पना गुंजोटे, शिक्षक इब्राहिम चौधरी,शिवमुर्ती स्वामी, सत्यपाल भंडारे,संतोष साखरे, शिक्षिका सुरेखा साळुंके,मायादेवी गायकवाड,जयश्री गोबाडे,साधना आळणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक शिवमुर्ती स्वामी यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यपाल भंडारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here