नृसिंह मुळे यांचा लिंगायत समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव 

0
242

उमरगा :- येथे आंतरराष्ट्रीय व्हीआयपी वधू-वर परिचय मेळावा दि. १४, १५ जून रोजी संपन्न झाला. या मेळाव्यात सध्या पुणे येथे  स्थायिक असलेले येथील नृसिंह मुळे यांचा लिंगायत समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.शिवा लिंगायत युवक संघटना लातूरच्या वतीने महाराष्ट्रासह राज्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या जवळपास १०० जणांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.नृसिंह मुळे मागील पंधरा वर्षापासून लिंगायत चळवळीत सक्रिय आहेत. राज्यातील अनेक लिंगायत मोर्चामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पुस्तकांना मुद्रित करण्यासाठी अर्थसहाय्य केलेलं आहे. अनुभव मंडप बसवकल्याण यांच्या वतीने मागील अनेक वर्षापासून त्यांचा सन्मान दरवर्षी करत आहेत. अनेक वृद्धाश्रम व अनाथ आश्रमास सदैव करत असतात. या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील, अॅड. सांबप्पा गिरवलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास आंध्र प्रदेश कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडूसह परदेशातून शंभर वधू-वरांनी भाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here