लोहारा :– तालुक्यातील वाडी वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत मुलांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.उज्वला शिवाजी बचाटे, उपाध्यक्ष दिलीप लकडे, उपसरपंच अंकुश भुजबळ, शालेय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व मुलांना शासनाकडून मिळालेला गणवेश, पाठ्यपुस्तके वितरित करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. यामध्ये शिरा, पुलाव असे पदार्थ देण्यात आले. या कार्यक्रमास गणपती बोडके सर, शिवाजी बचाटे, वीरनाथ पाटील, निकेश बचाटे, कोमारी अप्पा भुजबळ, बलभीम गिराम, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी ताई, वडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा वाडीवडगाव शाळेचे मुख्याध्यापक जीवन गायकवाड, शाळेतील शिक्षक एम.एच.शेख, एस.आर.शेरकर, कल्लेश्वर भुजबळ, जि.एस.शिंदे, एम.ए.भोजने यांच्यासह विद्यार्थी गावातील शिक्षण प्रेमी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.