उमरगा :– तालुक्यातील कोरेगांव वाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी डी.फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांकरिता दि. 16 रोजी कॅम्पस इंटरव्ह्यूव्ह आयोजित करण्यात आले. यावेळी झायडस लाईफसांयसेस लिमिटेड, गोवा येथील कंपनीने ऑनलाईन पद्धतीने कॅम्पस इंटरव्यूव्ह घेण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव विजय बेडदुर्गे व उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन यामध्ये महाविद्यालयातील 20 विद्यार्थ्यांची झायडस लाईफसांयसेस लिमिटेड, गोवा शाखेमध्ये निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे यांनी शुभेच्छा दिल्या. डी. फार्मसी विभागातील प्लेसमेंट सेल ऑफिसर प्रा.अशोक गायकवाड यांनी मेहनत घेतली व यशस्वी आयोजन केले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.मंजुषा गव्हाळे व विद्यार्थी उपस्थित होते.