उमरगा येथे शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

0
311

उमरगा :–  उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघाचे माजी  आमदार ज्ञानराज चौगुले यांचे शहरातील संपर्क कार्यालय येथे शिवसेना पक्षाच्या 59 व्या वर्धापन दिनानिमीत्त गुरुवार दि.१९ जुन रोजी उमरगा तालुका शिवसेनेच्या वतीने  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळयास जेष्ठ शिवसैनिक तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.  याप्रसंगी युवती सेना निरीक्षक ॲड.आकांक्षा चौगुले, माजी नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज जाधव, युवा सेना उपजिल्हाप्रमुख भगत माळी, तालुकाप्रमुख विनोद कोराळे, शहरप्रमुख अमर शिंदे, विद्यार्थी सेना ता.प्र. संदीप चौगुले, नाना मदनसुरे, शिवसेना वि.जा.भ.ज.सेल तालुकाप्रमुख गोपाळ घोडके, देवा चव्हाण, येळीचे सरपंच पतंग पवार, शहाजी येळीकर, शफी चौधरी, संजय माने, अरुण जगताप, दत्ता डोंगरे, डॉ.फरीद अत्तार, योगेश गायकवाड, प्रेम चव्हाण, सचिन आळंगे, चंद्रकांत मुळे, पृथ्वीराज हिरेमठ, अरुण गडदे, राज शिंदे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here