लोहारा :– महसूल मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर अभियानात 249 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 197 अर्ज तात्काळ निकाली काढण्यात आले. तर 52 अर्ज प्रलंबीत राहीले. .लोहारा तहसिल कार्यालयाच्या सभागृहात दि.20 जून रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर घेण्यात आले. यावेळी उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार रणजीतसिंह कोळेकर, निवासी नायब तहसिलदार रतन काजळे, लोहारा मंडळ अधिकारी बाळासाहेब बरनाळे, मंडळ अधिकारी वाजीद मनियार, अव्वल कारकून एजाज पटेल, निवडणुक विभागाचे वजीर अत्तार, पुरवठा निरीक्षक ऐश्वर्या जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उमरगा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तहसिल कार्यालयातील सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या विभागाच्या योजना व त्याचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया याबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांचे प्रत्यक्ष अर्ज स्विकारणे व त्यावर कारवाईची प्रक्रिया चालू झाली. या अभियानात लोहारा मंडळातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यावेळी लोहारा मंडळातील सर्व तलाठी, तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी, सीएससी सेंटर ऑपरेटर, आधार केंद्र चालक, यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरवठा विभागाचे कर्मचारी महादेव गोरे यांनी केले. अर्जाचा प्रकार – दाखल -निकाली- प्रलंबित फेरफार- 31 -30 -1,शिधापत्रिका – 37 – 22 — 15,सांगायचो,इंगायो – 138 — 104 — 34,आधार कार्ड – 28 – 28 —– 00,ॲग्रीस्टॅग- 15 —– 13 —– 2,एकूण —- 249 ——– 197 —- 52
Home ताज्या बातम्या लोहारा तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महाराजस्व अभियान समाधान शिबिरात 249 अर्ज प्राप्त, ...