भातागळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

0
20

 

लोहारा :– तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व प्रशाला भातागळी येथे 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्यम् – धनसंपदा असे शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्याचेच महत्व पटवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून भारताने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. या निमित्ताने शाळेमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी योगासनाची प्रात्यक्षिके केली. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना योगासनाचे किती महत्त्व आहे हे पटवून दिले. सोबतच योगासनामुळे शारीरिक, मानसिक,बौद्धिक व भावनिक असा सर्वांगीण विकास होतो याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योगासनाचे विविध प्रकार करून दाखवण्यात आले व त्याचे महत्त्व सांगण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विठ्ठल कवाळे,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कोंडीबा कारभारी, नंदकिशोर गायकवाड, बालाजी नाईक, बालाजी माने, मधुकर शिंदे, मेघराज कदम, सुषमा चट्टे , जनार्धन काटमोडे ,सूर्यकांत वैरागकर,शंकर काळे, रसूल शेख व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here