लोहारा शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात योग दिन साजरा

0
32

लोहारा :– वसंतदादा पाटील हायस्कूल सलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे दि.21 जून रोजी योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा शिक्षक नागनाथ पांढरे सर यांच्या नेतृत्वाखाली योगासनाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम पांढरे सरांनी भारतीय संस्कृतीतील योगासन व प्राणायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष योगासनाची सुरुवात करण्यात आली. पांढरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील मॅडम यांच्यासह शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here