उमरगा :– तालुक्यातील कोरेगांववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी व शिवाई इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग, येथे दि.21 रोजी जागतिक योग दिनानिमित्त योग शिबीर आयोजित करण्यात आले. योग गुरु व्यंकट जवळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बी.एच. बेडदुर्गे, सचिव विजय बेडदुर्गे व उपाध्यक्ष प्रा. अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. यावेळी योग गुरु व्यंकट जवळगे यांनी विद्यार्थ्यांना अनेक योग व प्राणायम यांचे फायदे सांगितले व अभ्यास करून घेतला.आसनांचा नियमित अभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते. रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते. अग्नी प्रदीप्त राहतो. भूक लागते. मनाची एकाग्रता वाढते. स्नायू व मज्जारज्जू या सर्वांचे कार्य सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथींचे कार्य सुधारते. आसनांमुळे आरोग्याचे संवर्धन होते. शरीरातील सर्व अवयव व मन हे एकत्रितपणे समन्वयाने काम करतात. त्यामुळे मनावरील व शरीरातील ताणतणाव कमी होते. आसनांमुळे शरीरातील विकृतीचे निराकरण होवून त्यांचे कार्यात सुधारणा होते परिणामी शरीर उत्तम स्थितीत राहते. मानसिक विकृती जसे काम क्रोध, मत्सर, द्वेष, लोभ, अहंकार यांवर नियंत्रण प्राप्त होते. आसनांमध्ये संधी आणि स्नायू यांना ताण बसतो त्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुधारतो. त्या स्नायूंचे कार्य सुधारते असे यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा. ओमकार पाटील, प्रा.प्रशांत वाघमारे, प्रा.शुभम सूर्यवंशी,प्रा.प्रियंका राठोड प्रा.अविनाश चौधरी, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.शहाबाज शेख , प्रा.अविनाश कुंभार, प्रा.शुभांगी बंदीचोडे, प्रा.मोनिका धुरे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.