कोरेगाववाडी  येथील शिवाई डि फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे भरीव यश 

0
68

 

उमरगा :– एमएसबीटीई उन्हाळी परीक्षेत शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी येथील डी. फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले. डी.फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल 100 टक्के तर द्वितीय वर्षाचा 94 टक्के निकाल लागला.

डी.फार्मसी प्रथम वर्षातील कु.सागर बनसोडे (87%), कु.श्रीपाल गडमोड (84.70%), कु. पल्लवी सलगर (83.40%), कु.निकिता कदेरे (82.60%), कु. नेहा कदेरे (80.20%) असे यश संपादन करावे. तसेच द्वितीय वर्षातील कु.निकिता चव्हाण (82.18%), कु.समिना मुल्ला (81.91%), कु.सब्बाकौसर मुल्ला (81.46%), कु.गायत्री पांचाळ (79.55%), कु.वैभवी वाघमारे (76.73%) यांनी यश मिळवले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.बी.एच. बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे व उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य महेश कदारे, विभागप्रमुख प्रा.संतोष जाखोटीया, प्रा. वैष्णवी फुगटे, प्रा. प्राजक्ता ननावरे,प्रा. धनश्री भुजंगे, प्रा. अंकिता वडजे, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here