लोहारा:– विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व बँकिंग परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, तसेच विद्यार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीचा लाभ घेऊन आपले आयुष्य सफल केले पाहिजे, असे प्रतिपादन तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी केले. शंकरराव जावळे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, लोहारा येथे आय.बी.एफ. स्किल्स अकॅडमी यांच्या वतीने कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन करुण ते बोलत होते. यावेळी राजर्षी शाहू महाराज व स्वर्गीय शंकरराव जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कॅम्पस मुलाखतीसाठी अमर गोडबोले (शाखा व्यवस्थापक, आय.बी.एफ स्किल्स अकॅडमी) हे प्रमुख मार्गदर्शक होते. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे हे होते. तसेच अविनाश हुमणे (शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक), वजीर अत्तार, डॉ.शिवाजी कदम, डॉ.मनोज सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील कॅम्पस मुलाखती विविध बँकांच्या नोकरीसाठी घेण्यात आल्या होत्या. यावेळी अमर गोडबोले यांनी बँकेच्या निवड प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी अभिषेक परीट यांनी विद्यार्थ्यांना बँक निवड प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. या मुलाखतीसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कॅम्पस मुलाखतीसाठी एकूण 35 विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध बँकेत नोकरी दिली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home नोकरी विषयक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व बँकिंग परीक्षेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे...