छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन

0
24

लोहारा:– सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाचे जनक, आदर्श शासक, धर्म, संस्कृती, राष्ट्रहित आणि सामाजिक एकात्मतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या महान लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त भाजपाचे नेते मा. आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून संपर्क कार्यालय परंडा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.जहीर चौधरी, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, वैद्यकीय आघाडीचे तालुकाध्यक्ष डॉ.आनंद मोरे, ता.उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, परसराम कोळी, जयंत सायकर, किरण कवटे, मिलिंद शिंदे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, हिमालय वाघमारे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here