धनादेश अनादरप्रकरणी परंडा न्यायालयाने सुनावला आरोपीस 2,50,000 रुपये दंड व दोन वर्ष साधा कारावास

0
69

 

लोहारा :– धनादेश अनादरप्रकरणी परंडा न्यायालयाने सुनावला आरोपीस 2,50,000 रुपये दंड व दोन वर्ष साधा कारावास. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी कि, परंडा येथील शेख शमी बादशाह यांचे घरी आरोपी जोतिराम पिंटु विष्णु गोळे याची दुधाच्या रतिभामधुन ओळख झाली होती, ओळखीचे रुपांतर मैत्रित झाले. आरोपी हा परंडा जवळीलच भोत्रा या गावातील राहणारा असल्यामुळे दोघांची चांगली मैत्री जमली, त्यातुनच दोघांचे आर्थिक देवाण — घेवाण सुरु झाले. साल सन 2016 मध्ये आरोपीस रक्कम रुपये 2,00,000 /- चे खाजगी कर्ज व इतर कामासाठी आवश्यकता असल्याने फिर्यादी शेख शमी बादशाह यांनी दि. 07/02/2016 रोजी आरोपीस रोख रक्कम रुपये 2,00,000 /- दिले होते. व ते आरोपीस सहा महिन्यात परत करतो असे आश्वासन व विश्वास दिला होता. फिर्यादीने मुदत संपल्यानंतर आरोपीकडे पैशाचा तगादा लावल्याने आरोपीने दि.14/09/2016 रोजी रक्कम रुपये 2,00,000 /- चा धनादेश दिला होता. तो अनादरीत झाल्याने सदरील प्रकरण फिर्यादीने आरोपीचे विरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात फौजदारी खटला क्रं. एस.एस.सी. क्रं. 644/2016 दाखल झाले. सदरील प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. दिलीप ग. जगताप साहेब यांचेसमोर होवुन फिर्यादीतर्फे आलेला, साक्षीपुरावा व झालेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस रक्कम रुपये 2,50,000 /- (अडीच लाख रुपये) व दोन वर्षाचा कारावासाची शिक्षा दि. 19/06/ 2025 रोजी सुनावण्यात आलेली आहे. आरोपी हा सततत न्यायालयात गैरहजर राहत असल्यामुळे अनेक वेळा वारंट काढुन देखील तो कोर्टात हजर राहत नसल्याने त्याचे जामीनदारास देखील अनेक वेळेस जामीन जप्त करणेबाबत नोटीस काढण्यात आली होती, तरी देखील आरोपी हा गैरहजरच राहत असल्याने सन्माननीय न्यायलयाने आरोपी उपस्थित नसताना सदरील निकाल जाहीर केलेला आहे. तसेच आरोपी हा फरार असल्याने सन्माननीय न्यायालयाने आरोपीची मालमत्ता जप्त करुन त्यातुन दंडाची रक्कम वसुल करुन फिर्यादीस रक्कम रुपये 2,00,000 /– नुकसान भरपाई देणेबाबत आदेशीत केले आहे, तसेच आरोपी आरोपी हा फरार असल्याने आरोपीविरुध्द दोषसिध्द वारंट अंमलबजावणीसाठी पोलीस स्टेशन परंडा यांचेकडे पाठविण्यात यावे व आरोपीविरुध्द काय कारवाई केली याचा दर 15 दिवसाला अहवाल सन्माननीय न्यायालयात सादर करणेबाबत आदेशीत केले आहे. सदरील प्रकरणात अॅड. ज्ञानेश्वर विरमल लोखंडे व अॅड. बुशरा जहीर चौधरी यांनी अॅड. जहीर चौधरी यांनी अॅड. जहीर रजिया इद्रिस चौधरी यांना सहाय्य केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here