नागराळ लो. येथे ग्राम दरबार कार्यक्रम संपन्न 

0
11

लोहारा  :– तालुक्यातील नागराळ लो. येथील अण्णाभाऊ साठे नगर येथील समाज मंदीरात दि. 25 जून रोजी एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा नागराळ लो ग्रामपंचायतचे प्रशासक बी.यु.लोखंडे होते. यावेळी विस्तार अधिकारी पी.एम.गडदे, आरोग्य विस्तार अधिकारी एस.एम.जमादार, अंगणवाडी पर्यवेक्षिका पी.एन. दुधभाते, सीएचओ संतोष गंभीरे, कृषी सहाय्यक गिरीश पिचे, व्ही.एन.सोनटक्के, आरोग्य सहाय्यक एक.बी.जगताप, माजी सैनिक अभिमान गोरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या योजना व लाभ घेण्यासाठी राबविली जाणारी प्रक्रीयाबाबत माहीती दिली. नागरीकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आरोग्य विभागाकडून नागरीक, विद्यार्थ्यांची विविध तपासण्या केल्या.यावेळीअंगणवाडी कार्यकर्ती ताई कुंभार, आशा कार्यकर्ती अर्चना भोकरे, सीआरपी जयश्री गोरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण माटे, ग्रामरोजगार सेवक पप्पू गोरे,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी अजित बिराजदार, अर्जुन गोरे, ॲड. राहुल भोंडवे, ॲड.गिरीश गोरे,नारायण गोरे, बळीराम गोरे, चेतन गोरे संतोष गोरे, वाल्मिक कोळी, वृषीकेत गोरे, जगदेवी सावंत, दैवशाला गोरे, रेखा माटे, शामल घाडगे,सुरेखा जाधव ,भरत रोडगे, शेषेराव गोरे, लक्ष्मण रोडगे, सुशांत गोरे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील तानाजी माटे व सुत्रसंचलन ग्रामपंचायत अधिकारी देविदास कुर्ले यांनी केले. तर आभार किरण चिंचोले यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here