उमरगा काँग्रेस च्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी 

0
16

 

उमरगा :– शहरातील काॅग्रेस भवन येथे दि.26 रोजी  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अत्यंत श्रद्धा आणि सन्मानपूर्वकरित्या उमरगा तालुका काॅग्रेस कमीटीचे अध्यक्ष  अर्जुन बिराजदार यांच्या हस्ते पुजन करून साजरी करण्यात आली.सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेचे महान मूल्य जपणाऱ्या या थोर सम्राटाच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने वंचित आणि उपेक्षित लोकांसाठी खर्ची घालणारे, सामाजिक समतेचे दिपस्तंभ, आरक्षणाचे जनक, बहुजन समाजाच्या न्यायहक्काचे आधारस्तंभ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन. सामाजिक न्यायासाठी त्यांचे कृतीशील विचार कित्येक पिढ्यांसाठी उर्जादायी राहतील असे भाष्यं उमरगा तालुका काॅग्रेस कमीटीचे अध्यक्ष  अर्जुन बिराजदार यानी केले, या वेळी युवक कांग्रेसचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष  दादासाहेब गायकवाड, काॅग्रेस कमीटीचे शहराध्यक्ष  विजयजी दळगडे, शहर कार्याध्यक्ष  अभिषेक औरादे, अमीत रेड्डी, श्रीहरी कांबळे आदी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here