उमरगा :– तालुक्यातील जे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत व ज्यांची DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीमध्ये नांव नोंदणी अद्याप झालेली नाही, अशा सर्व लाभार्थ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांना उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार उमरगा यांचेकडून जाहीर आवाहन करण्यात येते की, उक्त योजनेचा लाभ मिळाविण्यासाठी DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीमध्ये नांव नोंदणी करणे आवश्यक असून ,अनेक लाभार्थ्यांनी DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीमध्ये नांव नोंदणी अद्याप पूर्ण करुन घेतलेली नाही.अशा लाभार्थ्यांसाठी उमरगा तालुक्यामध्ये शहरी व ग्रामीण भागामध्ये दि. 02/07/2025 व 03/07/2025 रोजी विशेष गृहभेट मोहिम राबविण्यात येणार आहे तरी या गृहभेट मोहिमेचा संबंधित लाभार्थ्यांनी या लाभ घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे ,उमरगा चे तहसिलदार गोविंद येरमे यांनी केले आहे. तालुक्यात ज्यांच्या घरात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असल्यास त्यांची आवश्यक कागदपत्रे जसे 1. संबंधीत लाभार्थ्यांचे आधार कार्ड (बैंक खात्याशी लिंक असलेले) 2. केवायसी प्रक्रीया पूर्ण असलेले बैंक खाते पासबुकाची छायाप्रत व आधार क्रमांकाशी जोडणी केलेला मोबाईल क्रमांक इ. तहसील कार्यालयाचे संबंधीत नियुक्त कर्मचारी (महसूल सेवक) / ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचेकडे देण्यात यावेत.तसेच याव्दारे तालुक्यातील लोक प्रतिनधी व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी/कार्यकर्ते यांना देखील जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या भागामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजजेचे लाभार्थी असल्यास व ज्यांची DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीमध्ये अद्याप नांव नोंदणी झालेली नाही अशा लाभाथ्यांची वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे संबंधीत लाभार्थ्यांकडून मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात यावे व याबाबत आपल्या भागामध्ये जगजागृती करुन प्रशासनास सहकार्य करावे.असे जाहीर आवाहन दत्तु शेवाळे, उपविभागीय अधिकारी उमरगा व गोविंद येरमे, तहसिलदार उमरगा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.