धाराशिवच्या पार्वती हॉस्पिटल तोडफोडी संदर्भात उमरगा आय एम ए चा निषेध ; तहसिलदार यांना तातडीने कठोर कारवाई करणेबाबत निवेदन

0
149

उमरगा :– धाराशिव शहरातील पार्वती हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात  दि. 24 रोजी रात्री काही अज्ञात व्यक्तींनी घुसून अत्यंत अमानुष स्वरूपाची तोडफोड केली. यामध्ये हॉस्पिटलची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली असून, रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आय एम ए शाखा उमरगा च्यावतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत असून,तसेच  संबंधीतावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी अशी  मागणी  इंडीयन मेडीकल असोसिएशन च्यावतीने  उमरगा चे प्रभारी तहसीलदार डाॅ.अमित भारती यांना दि.26  रोजी दिलेल्या निवेदना मार्फत करण्यात आली आहे. निवेदनात  पुढे म्हंटले आहे की,ही घटना केवळ एका संस्थेवरचा हल्ला नसून, संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेच्या सुरक्षिततेला दिलेला गंभीर आव्हान आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घालणे समाजहितासाठी धोकादायक ठरू शकते.सदर गुन्ह्यातील आरोपींवर “वैद्यकीय व्यावसायिक व वैद्यकीय संस्थांवरील हिंसाचार प्रतिबंधक कायदा” (Prevention of Violence Against Medical Professionals and Medical Establishments) अंतर्गत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत.अशी मागणी करण्यात आली असून त्याच बरोबर इतर ही मागण्या  करण्यात असून, सदर घटनेची तात्काळ व सखोल चौकशी करण्यात यावी, गुन्हेगारांना त्वरीत अटक करून न्यायप्रविष्ट करावे, रुग्णालय व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवावी,अशा घटनांच्या प्रतिबंधासाठी कायमस्वरूपी यंत्रणा विकसित करावी.अशा विविध मागण्यासंदर्भातचे निवेदन उमरगा चे प्रभारी तहसिलदार डाॅ.अमित भारती यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर IMA उमरगा चे अध्यक्ष डाॅ. अनंत मुगळे, सचिव डाॅ.नामदेव बिराजदार, डाॅ.दिपक चव्हाण, डाॅ.प्रशांत मोरे, माजी अध्यक्ष: डॉ. दीपा मोरे,कोषाध्यक्ष डॉ. सतीश नरवडे , सहसचिव: डॉ. विजय बेददुर्गे ,कार्यकारी समिती सदस्य: डॉ. काशीनाथ चिनोचोली,डॉ. उदय मोरे,डॉ. विजय पाटील ,डॉ. डी.एस. थिटे ,डॉ. दीपक पोफळे ,डाॅ.अभय शिंदे, डाॅ. इनामदार, डाॅ.कवठे, डाॅ.राठोड  आदी सदस्याच्या सह्या आहेत.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here