उमरगा :– तालुक्यातील नाईचाकूर येथे दि. 27 जून रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,उप विभागीय कृषी अधिकारी, महादेव आसलकर यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापूरे ,मंडळ कृषी अधिकारी यांनी शेतीशाळेचे नियोजन केले. तुर पिकाच्या पहिल्या वर्गामध्ये शेतकऱ्यांना तुर पिका विषयी सविस्तर माहिती दिली. मंडळ कृषि अधिकारी दिपक मुळे यांनी तुर पिकाची टोकन लागवड पद्धत,खत व सिंचन व्यवस्थापन, पीक फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबतची माहिती दिली. गावचे सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पवार यांनी तुर पिकाची वाण निवड,पाणी व्यवस्थापन,तुर पिकांमध्ये शेंडा खुडणीचे महत्त्व व पध्दती, रुंद वरंबा पद्धतीने (बि बी एफ) लागवड कशी व का करावी याबद्दल माहिती दिली.उपस्थित प्रत्यक्ष शेतक-यांना टोकन पद्धतीने डेमो कसा करावा हे त्यांच्या कडुनच करुन घेण्यात आले. तसेच गावचे प्रगतशील शेतकरी राम पवार,माधव पवार यांनी गेल्या वर्षी तूर पिक लागवड टोकन पद्धतीने केले होते त्यांचे अनुभव या शेतीशाळेस उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना सांगितले. सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पवार व युवा प्रशिक्षणार्थी अमित पवार यांनी सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी शेतकरी नोंदणी करण्याचे महत्त्व व शेतकरी नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी पवार यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना जसे पी एम किसान, अनुदानावर बियाणे नोंदणी, महाडीबीटी अंतर्गत योजना विविध योजना साठी अर्ज करणे,पीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई इत्यादी सर्व योजनांसाठी शेतकरी नोंदणी क्रमांक अनिवार्य करण्यात आल्याचे सांगितले. महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड,तुती लागवड,गांडूळ शेड,नाडेप, शेततळे व महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकार च्या योजना विषयी माहिती देण्यात आली.मंडळ कृषी अधिकारी दिपक मुळे, उप कृषी अधिकारी किरण ढोकळे यांचेसह प्रगतशील शेतकरी राम हणमंत पवार, गोविंद पवार, सतिश माने, शिवाजी पवार,अमोल पवार, संतोष सिरसीले, दिगंबर सिरशीले, व्यंकट गव्हाळे, यशपाल कांबळे, सचिन काळे,धीरज गव्हाळे,भास्कर कवाले, धनराज पालमप्पले,गुणवंत पवार,हिरा पवार,मुळजे शंकर, पांचाळ,मैनू शेख ईतर शेतकरी उपस्थित होते. युवा प्रशिक्षणार्थी अमित पवार व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.