उमरगा :– तालुक्यातील कोरेगांववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी, येथे बी.फार्मसी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी फेअरवेल पार्टीचे दि.29 रोजी आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास सुभेदार, संस्थेचे अध्यक्ष बी.एच.बेडदुर्गे, सचिव डॉ.विजय बेडदुर्गे, उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही शाखेची पदवी मिळविणे हे जीवनातील खूप मोठी उपलब्धी असते. त्याबरोबरच पुढील आयुष्यात योग्य मार्ग निवडणे व त्यावर वाटचाल करणे गरजेचे असते. यामध्ये शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचा मार्ग निवडावा. प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आपले व कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करावे असे यावेळी डॉ.विकास सुभेदार म्हणाले. कार्यक्रमासाठी बी.फार्मसी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. यावेळी प्राचार्य महेश कदारे, डॉ.अश्विनी सुर्यवंशी, प्रा.परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा.फुलचंद काजळे, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.चनबस शेटगार, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अंकिता यादव, प्रा.शितल शेळके, प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.मंजुषा गव्हाळे, प्रा.ओमकार पाटील, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार कु. नंदिनी बजाज हीने मानले.


