नळदुर्ग शहरात भागवत सप्ताहाचे आयोजन 

0
26

नळदुर्ग  :– शहरात गेल्या ५२ वर्षांपासून सुरु असलेली भागवत सप्ताहाची परंपरा यावर्षीही संपन्न होणार आहे.नळदुर्ग येथील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव अहंकारी गुरुजी यांच्या निवासस्थानी दिनांक ४ जुलै ते १० जुलै या दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.अहंकारी परिवाराकडून मागील ५२ वर्षांपासून हा भागवत सप्ताह अखंडपणे सुरु आहे..या सात दिवसात वे.शा.सं.श्रीराम जोशी महाराज ( केज ) यांच्या अमृतवाणीने भागवत कथा सांगितली जाते..४ जुलै पासून सुरु होणाऱ्या या सप्ताह मध्ये अनेक कार्यक्रम राबवले जातात.. दिनांक ६ जुलैला आषाढी एकादशी, ८ जुलैला गोवर्धन काला, ९ जुलैला श्रीकृष्ण – सुदामा भेट सुदाम्याचे पोहे तर १० जुलैला गुरुपौर्णिमाला समाप्ती असते.. यावेळी पाद्यपूजा केली जाते त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते.तरी या भागवत सप्ताहासाठी सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती .बाबुराव – सौ.जयश्री बाबुराव अहंकारी, वसंतराव – सौ.वनमाला वसंतराव अहंकारी. बळवंत – सौ.माधुरी बळवंत अहंकारी, अनंत – सौ.संध्या अनंत अहंकारी, विकास – सौ.अश्वीनी विकास अहंकारी, वैभव – सौ.वर्षा वैभव अहंकारी,योगेश – सौ. अदिती योगेश अहंकारी,  सुनिल पाटील यांच्यासह अहंकारी परिवाराकडून विनंती करण्यात आली आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here