येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील 17  विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय

0
540

उमरगा :-  तालुक्यातील येणेगुर येथील परमहंस शिक्षण संस्था संचलित कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील 17 विद्यार्थ्यांना उल्टी, मळमळ चा त्रास झाल्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे उपचार सुरू  असल्याची घटना घडली असून संबंधीत घटनेसंदर्भात परिसरात चिंतेचा विषय बनला आहे.

 

 

आरोग्य विभागाचे अधिकारी शाळेवरती दाखल झाले असुन वृत्त हाती येईपर्यंत तपासणी चालू आहे परत अजुन तीन विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने त्यांनाही दवाखान्याकडे नेण्यात आले आहे. एकुण 17 विद्यार्थीना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आणखीन विद्यार्थींची संख्या वाढण्याची शक्यता असून, मागील आठ ते दहा दिवसापासून बऱ्याच विद्यार्थांना डोके दुखने, मळमळ होणे, उलट्या होणे असा त्रास होऊन ही संबंधित प्रकाराकडे संस्थेचे अध्यक्ष ,शाळेतील शिक्षक, व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा पालकात सुरु असल्याचे बोलले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष तसेच शिक्षक, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक तक्रारी वाढता क्षणी बारकाई लक्ष देवून उपाय योजना करणे आपेक्षीत असताना ही, दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष व सर्व कर्मचाऱ्यांनी बारकाईने पिण्याच्या पाण्याकडे, पोषण आहार व शाळेच्या संपूर्ण स्वच्छतेकडे लक्ष देणे गरज असून, तसेच विद्यार्थीकडे लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. शाळेमध्ये फिल्टर पाण्याची सोय व्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here