येणेगुर येथील विषबाधाग्रस्त विद्यार्थ्यांची उपजिल्हा रुग्णालयात उमरगा येथे भाजपाचे युवा नेते हर्षवर्धन भैय्या चालुक्य यांनी घेतली भेट 

0
254

 

लोहारा :–  येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दि.4 जुलै रोजी गढूळ पाणी पिल्यामुळे जुलाब, उलटी, छाती दुखणे व चक्कर येणे अशा त्रासाला सामोरे जावे लागले. आजारी पडलेली ही बालके उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहेत. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच भाजपचे नेते हर्षवर्धन भैय्या चालुक्य यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे उपस्थित राहून अधिकाऱ्यांशी व पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर चौकशी केली.

डॉक्टरांना आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, हंसराज गायकवाड, भाजपा माजी माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील (लोहारा), सागर पाटील, बालाजी चव्हाण, नगरसेवक अमर वरवटे, रियाज शेख, नितीन खामितकर, मोहन जेवळीकर, मुसा औटी, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here