लोहारा :– शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील 7 गावात जी. के. फाउंडेशन पुणे व ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील मारुती महाराज मंदिरात दि.7 जुलै रोजी, महिला केंद्र उत्तर जेवळी येथे दि.8 जुलै रोजी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर माकणी येथे दि.9 जुलै रोजी, सांस्कृतिक सभागृह धानुरी येथे दि.10 जुलै रोजी, शांतेश्वर मंदिर सास्तूर येथे दि.11 जुलै रोजी, ग्रामपंचायत कार्यालय तावशीगड येथे दि.12 जुलै रोजी, महादेव मंदिर भातागळी येथे दि.13 जुलै रोजी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास नोंदणीसाठी अमर शिरोळे मो. नं. 7756875048, मंगेश सुतार मो. नं. 8485042026, प्रदिप पाटील मो.नं. 8975232823, यांच्याशी संपर्क साधावा. या नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहान ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष तथा युवती सेना मराठवाडा निरीक्षक अॅड आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले व जी. के. फाउंडेशन पुणे उपाध्यक्ष जगदिश खडके यांनी केले आहे.
Home आरोग्य व शिक्षण जी.के.फाउंडेशन , ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व...


