माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने भाजपाचे विधान परिषद सदस्य एम.जी.मुळे (कर्नाटक) यांचा सत्कार

0
179

लोहारा :- भाजपाचे विधान परिषद सदस्य एम.जी.मुळे कर्नाटक तथा माजी अध्यक्ष, कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळ (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले (उमरगा) यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेना उपनेते तथा माजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने विधान परिषद सदस्य एम.जी.मुळे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी युवती सेना मराठवाडा निरीक्षक अॅड.आकांक्षा चौगुले, अदि उपस्थित होते. यावेळी विविध राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने ‘दक्षीण शिव-स्वराज्य स्मारक गौरव’ प्रस्ताव संकल्पनेबाबत चर्चा झाली. दक्षीण भारतातील जी स्थळे श्री.शहाजीराजे भोसले महाराज, श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची साक्ष ठरली. ही स्थळे आजही दुर्लक्षीत आहेत. यामध्ये श्री.शहाजीराजे भोसले समाधी स्थळ होदिगीरी (दावणगेरे – कर्नाटक) यांसह इतर ९ स्थळांचा समावेश आहे. या सर्व ऐतिहासीक स्थळांची एक श्रृंखला (सर्कीट) तयार करून त्यांचे जतन, संवर्धन आणि सर्वांगिण विकासाबाबतचा प्रस्ताव तयार करण्यासाठी आम्ही लवकरच मुख्य शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेणार आहोत. ही सर्व स्थळे शिवरायांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो जनसमुदायाची स्फुर्ती स्थाने असुन यांच्या विकासातुन पर्यटन श्रृंखला तयार होऊन मराठी माणसे तीर्थाटनाप्रमाणे या स्फुर्ती स्थळांचे दर्शन करून तेथुन प्रेरणा घेतील, अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here