उमरगा :– तालुक्यातील कोरेगांववाडी येथील शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि. 5 रोजी एमएसबीटीई उन्हाळी वार्षिक परीक्षेतील उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एच.बेडदुर्गे व प्रमुख पाहुणे म्हणून सचिव डॉ.विजय बेडदुर्गे व उपाध्यक्ष प्रा.अजय बेडदुर्गे यांची उपस्थिती होती. तसेच विद्यार्थी व पालक यांचीही उपस्थिती होती.
डी.फार्मसी प्रथम वर्षातील कु.सागर बनसोडे, कु.श्रीपाल गडमोड, कु. पल्लवी सलगर, कु.निकिता कदेरे, कु. नेहा कदेरे तसेच द्वितीय वर्षातील कु.निकिता चव्हाण, कु.समिना मुल्ला, कु.सब्बाकौसर मुल्ला, कु.गायत्री पांचाळ, कु.वैभवी वाघमारे या गुणवंत विदयार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.अजय बेडदुर्गे यांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून तयार केलेला शैक्षणिक कामकामाचा आराखडा विद्यार्थी व पालकांसमोर मांडला. प्रा.संतोष जाखोटीया, प्रा.अशोक गायकवाड व विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. संस्थेचे अध्यक्ष श्री.बी.एच. बेडदुर्गे सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य महेश कदारे यांनी केले. यावेळी प्राचार्य महेश कदारे, विभागप्रमुख प्रा.संतोष जाखोटीया, डॉ.अश्विनी सूर्यवंशी, प्रा.मंजुषा भोकरे, प्रा. परीक्षित शिरूरे, प्रा.किरण पांचाळ, प्रा. श्रीकृष्ण मुळे, प्रा.फुलचंद काजळे, प्रा.शितल शेळके, प्रा.अंकिता यादव, प्रा.धनश्री भुजंगे, प्रा.अशोक गायकवाड, प्रा.ओमकार पाटील, महेश थोरे, मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.मंजुषा गव्हाळे यांनी मानले.


