लोहारा :- भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मंत्री, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी भाजपा कार्यालय प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा भाजपाच्या वतीने बसवराज पाटील यांचा भाजपाचे नेते तथा आ.राणाजगजितसिंह पाटील व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सत्कार केला. यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश का.सदस्य खंडेराव चौरे, प्रदेश का.सदस्य तथा मजुर फेडरेशन अध्यक्ष सतीश दंडनाईक, शहराध्यक्ष अभय इंगळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, माजी नगराध्यक्षअमित शिंदे, मधुकर तावडे, भारत डोलारे, इंद्रजित देवकते, नितीन भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


