लोहारा :– तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक 2025 ते 2030 या कालावधीसाठी एकुण 44 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पध्दतीने निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत दि.16.04.2025 रोजी काढण्यातत आली होती. सदर आरक्षण सोडत ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचे शासन अधिसूचना असाधारण क्र 213 दि.13.06.2025 अन्वरये रद्द करण्यात येत आहे. असे सूचित केले आहे. त्यासनुसार जिल्हासधिकारी क्रितीकिरण पुजार धाराशिव यांचे अधिसूचना क्र. 2025/ सा.प्र./ ग्रा.पं.नि/का-1/सिआर-02 दिनांक. 03. 07.2025 नुसार नव्याने आरक्षण सोडत कार्यक्रम उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे उमरगा यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती बैठक हॉल लोहारा येथे दिनांक.10.07.2025 रोजी दुपारी 04-00 वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी लोहारा तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी सरपंच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे अवाहन तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, लोहारा यांनी केले आहे.
Home ताज्या बातम्या लोहारा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत कार्यक्रम 10 जुलै रोजी


