प्रतिभा निकेतन  विद्यालय  येथे मुला- मुलींना पोलिस उपनिरीक्षक व पिंक पथक प्रमुख– शोभा पवार यांचे मार्गदर्शन

0
90

 

उमरगा :–  तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालयात उमरगा येथील पोलिस उपनिरीक्षक पिंक पथक प्रमूख शोभा पवार मॅडम यांनी आजच्या काळात पालक मुलांशी काही गोष्टी बोलतच नाहीत आणि मुलांना चुकीची माहिती मिळते, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. वयानुसार आपण आपल्या मुलांना माहिती देत राहतो. त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, ते कायम सुरक्षित राहावे. या गोष्टीची त्यांना चिंता सतावत असते. अशावेळी मुलांच्या सुरक्षेसाठी पालक काही खास पाऊले उचलतात. यासह त्यांना गुड टच बॅड टचची माहिती देणंही गरजेचं आहे. मुलांची जशी समज वाढते, तशी त्यांना पालकांनी अनेक गोष्टींची माहिती द्यायला हवी.तसेच 112 ला फोन करून आपली तक्रार नोंदवावी,किंवा अडचण असल्यास फोन लावावी. पोस्को कायदा काय असतो त्याबद्दल माहिती सांगून मार्गदर्शन केले.पालक अनेकदा मुलांना स्वतःचे सरंक्षण कसे करावे, याची माहिती देतात. रस्ता क्रॉस कसे करावे, सीटबेल्ट कसे लावावे, कोणा अनोळखी व्यक्तीने काही दिले तर खाऊ नये, असे आपण त्यांना सांगत असतो. पण गुड टच बॅड टचबद्दल बोलणं टाळतो. त्यांना याबद्दल योग्य वयात माहिती देणं गरजेचं आहे.’मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सची माहिती देणे गरजेचे आहे. जर कोणा व्यक्तीने प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर, त्यांना त्याच वेळी ओरडणे किंवा विरोध करण्यास शिकवा. काही लोकं चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष दाखवून मुलांना उचलून घेतात, त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श करतात. अशावेळी अमिषाला बळी न पडता, तेथून पळ कसा काढायचा हे शिकवा. अनेकदा लहान मुलांना गुड टच आणि बॅड टचबद्दल माहिती नसते. अशावेळी जर त्यांना कोणी चुकीच्या ठिकाणी स्पर्श केलं, साहजिक त्यांना भीती वाटेल. ते या गोष्टी उघडपणे कोणाकडेही व्यक्त करू शकत नाहीत. अशा स्थितीत मुलं खचतात. या गोष्टींचा त्यांच्या मानसिक आणि अभ्यासावरही परिणाम होतो. त्यामुळे मुलांच्या वागण्याकडे नेहमी लक्ष द्या.यात असे करणारे 90% हे परिचयाचे,जवळचे नातेवाईक असतात असे तरी याकडे आपण गांभीर्याने पाहिले असे प्रतिपादन मॅडम यांनी केले.यावेळी पोलिस कॉन्स्टेबल,नीलकंठ कठोरे, विलास राठोड लखन गायकवाड, प्रा.पटवरी एस.डी.मॅडम,प्रा.उण्णद आर.आर.मॅडम,, प्रा.बंडगर बिभीषण सर, प्रा.महामुनी उमाकांत सर,प्रा.सूर्यवंशी अजित सर,प्रा.रत्नदीप वाकडे यांच्यासह विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here