उमरगा : शहरातील राहत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जाहेद मुल्ला यांच्या कोरोना काळातील समाज कार्याची दखल घेत महाराष्ट्र रफ्तार न्यूज मराठीच्या वर्धापनदिनानिमित्त समाजरत्न पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मुल्ला यांना सन्मानित करण्यात आले. राहत चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष जाहेद मुल्ला हे कोविड काळापासून नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असतात. ईदगाह कोविड सेंटर मध्ये त्यांनी रुग्णांची सेवा केली. राहत चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने शव शीतपेटी मोफत देतात , ट्रस्ट च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात या सगळ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जाहेद मुल्ला यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार देवू सन्मानित करण्यात आले.


