नृसिंह मुळे यांना ‘कर्मजित पुरस्कार’ने सन्मान

0
15

 

पुणे  :– येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे भव्यदिव्य नयनरम्य दिमाखदार सोहळा संपन्न भारतीय संस्कृतीचा वारसा जपत आधुनिकतेकडे झेप घेत असलेल्या ‘नृत्यकला संगम – २०२५’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वी आयोजन आशुतोष डान्स स्टुडिओज् आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या रंगतदार कार्यक्रमात “संस्कार, संस्कृती, सन्मान !” या तत्त्ववाक्याच्या अधिष्ठानावर समाजकार्य, कला आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी , ‌ मा. नृसिंह मुळे यांना “कर्मजित पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.नृसिंह मुळे मागील पंधरा वर्षापासून विविध सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. अनेक वृद्धाश्रम व अनाथ आश्रमास सदैव करत असतात.महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पुस्तकांना मुद्रित व वितरण करण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. अनुभव मंडप बसवकल्याण यांच्या वतीने मागील अनेक वर्षापासून त्यांचा सन्मान दरवर्षी करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मिळालेला सन्मान हा त्यांच्या कार्याचा समाजप्रती असलेल्या निष्ठेचा आणि प्रामाणिक योगदानाचा गौरव असून, हा पुरस्कार नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व नाट्यपरिषद, पुणे शाखा) यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष . डॉ. अशोकजी नगरकर सर – (वरिष्ठ शास्त्रज्ञ (रि.), जॉइंट डायरेक्टर, डीआरडीओ, भारत सरकार) हे होते.  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सुनिल गोडबोले  सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते, सुरेश खोपडे – राष्ट्रपती शौर्य पदक विजेते, (आय.पी.एस. नि.) शहाजीराव पाटील – (डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस (नि.), अभिनेते, निर्माते) राहुल पोकळे – अध्यक्ष, राष्ट्रसेवा समूह, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस,गो. छबूताई वैरागडे मॅडम – माजी नगरसेविका, चंद्रपूर, संजीवनीताई बालगुडे मॅडम – अध्यक्षा, प्रियंका महिला उद्योग संस्था, RJ. सुमित – सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी व अभिनेता, पियुष गजधने – युवा उद्योजक, प्रेरणादायी वक्ते, वैभव ढुस – युवा नेतृत्व,अनिकेत काकासाहेब चव्हाण – संचालक, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, सी. विजया मानमोडे मॅडम,या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनानेही सर्वांची मने जिंकली. संदीप पाटील– सेलिब्रिटी अँकर, गायक, अभिनेता, बाळकृष्ण नेहरकर सर – सुप्रसिद्ध निवेदक व खेळांचे जाणते अभ्यासक,या सोहळ्यात नृत्यकलेचा बहारदार नजराणा, लोककला, गौरव सन्मान अशा विविधतेने सजलेला कार्यक्रम पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here