आत्मिक समाधानासाठी गुरू हवेच — प्रा. यशवंत चंदनशिवे

0
57

 

लोहारा:–  येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये दिनांक 10 जुलै रोजी ” गुरुपौर्णिमा ” उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य शहाजी महावीर, प्रा.यशवंत चंदनशिवे व मीरा माने यांच्या हस्ते भारतमाता व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते स्कूलमधील सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व लेखणी भेट देऊन सत्कार करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे महती सांगणारे गीत व आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मीरा माने यांनी गुरुंविषयी सांगितले की, आपले आई वडील हे पहिले गुरु, शिक्षक हे दुसरे आणि अध्यात्मिक हे तिसरे गुरु आहेत. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन करताना प्रा. चंदनशिवे यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून गुरु परंपरा चालत आलेली आहे. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवद्गीता या सर्वच ग्रंथात गुरु परंपरेचे महत्त्व विषद केले आहे, भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर फक्त अर्जुनालाच उपदेश दिला नाही तर संपूर्ण विश्वातील मानवाचे कल्याण व्हावे या अर्थानीच गीतेच्या माध्यमातून समस्त मानव जातीला उपदेश दिला आहे. आज आधुनिक युगात जरी आमचा एखादया व्यक्तीस गुरु मानत असलो तरी पुस्तक व ग्रंथानाही आपण गुरु मानले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीस जीवनात आपले ध्येय गाठायचे असल्यास गुरूंचे मार्गदर्शन गरजेचे आहे. याप्रसंगी संचालिका सविता जाधव, सोनाली काटे, अनिता मनशेट्टी, ईश्वरी माने, अपर्णा सुर्यवंशी, अर्चना सोनके, सुलोचना वकील, रेश्मा शेख, सिद्धेश्र्वर सूरवसे, प्रज्योत माळवदकर यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली गोरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री रमेश गिराम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here