लोहारा :– तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात गुरुवारी (दि.१०) गुरु पोर्णिमा उत्सवा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तालुक्यातील जेवळी परिसरात वीरशैव संप्रदायात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अद्यापही मठ व मठाधीश परंपरेला महत्त्व आहे. भूकंपानतर येथील श्री गुरु सिद्धेश्वर मठ हे नव्याने पुनर्वसित जेवळी गावात जवळपास दीड कोटी रुपये लोक वाट्यातून बांधण्यात आले आहे. या मठात सातत्याने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतात. गुरुवारी (दि.१०) गुरूपौर्णिमा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी ७ वाजता येथील श्री विरभद्रेश्वरांच्या मंदिरात रूद्राभिषेक व महाआरती, आठ वाजता श्री गुरूपाद पुजा, नऊ वाजता मठाधीश मनिप्र गुरु गंगाधर महास्वामीजीना भक्ताकडून महा वस्त्रे प्रदान करण्यात आले. यानंतर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील फाउंडेशनच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कर्नाटक- महाराष्ट्राच्या या सीमावर्ती भागातील विविध गावातून हजारो भाविक भक्त दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित राहिले. यावेळी दिवसभरात उस्मानाबाद सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील, युवती सेना मराठवाडा निरीक्षक तथा ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशी संस्थेचे अध्यक्ष ॲड.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संघटक ॲड.दिपक जवळगे, शिवसेनेचे तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, भाजपा नेते राजेंद्र पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील (उमरगा), बुद्धिवंत साखरे, सचिन पाटील (उमरगा), सरपंच महानंदा पणुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, दत्ता चटगे, योगेश राठोड, गणेश अंबर, बाजार समितीचे माजी उपसभापती नागनाथ पाटील, नगरसेवक अविनाश माळी, हरी लोखंडे, विठ्ठल साई साखर कारखान्याचे संचालक ॲड.संजय बिराजदार, दिलीप पाटील, ॲड.विश्वनाथ पत्रिगे, ॲड.जी.के. गायकवाड, शिवराज चिनगुंडे, शंकर जट्टे, मल्लिनाथ नि.वेलदोडे, दीपक मुळे, दत्तात्रय चटगे, विकास चुंगे, मोहन जेवऴीकर, बालाजी चव्हाण,आदींनी गुरुपोर्णिमा निमित्त उपस्थित राहून दर्शन घेतले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्लिनाथ डिग्गे, महादेव मोघे, गुंडाप्पा कारभारी, सुभाष सारणे, शिवशंकर कारभारी, बसवराज स्वामी, योगीराज सोळसे, रोहित कारभारी, स्वप्निल डिग्गे, प्रदीप पाटील, समर्थ तांबडे, ओमकार भुसाप्पा, संजय तांबडे, कमलाकर कोळी गुरुजी, चंद्रकांत ढोबळे, सुभाष चटगे, महादेव सारणे, नागेश उपाशे, गौरव तांबडे, समर्थ कोरे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले आहे.


