उमरगा :– तथागत गौतम बुद्धाच्या काळापासून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत चालणाऱ्या वर्षावासात ” बुद्ध आणि त्यांचा धम्म” या पवित्र ग्रंथाचे वाचन करण्यात येते. तालुक्यातील जकेकूर येळी ,कोरेगाव, कुन्हाळी, औराद कसगी, तुरोरी ,पंचशील नगर उमरगा, गुंजोटी, येणेगुर,बेडगा, जवळगा बेट आदी गावात वर्षावास प्रारंभ करण्यात आला आहे. १० जुलै २०२५ आषाढ पौर्णिमा ते दि.७ आक्टोबर २०२५ अश्विन पौर्णिमा पर्यंत सुरू राहणार आहे तसेच भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने 20 विषयाची यादीतील विषया प्रमाणे विषय मालिका वर्षावासाचे निमित्ताने आयोजन केले आहे. ठिकाणी धम्मगुरू, बौद्धाचार्य ,केंद्रीय शिक्षक प्रवचन देणार आहेत अशा तऱ्हेने संपूर्ण नियोजन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले आहे
वर्षावास यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, तालुकाध्यक्ष आनंदकुमार कांबळे,अविनाश भालेराव,राजेंद्र सूर्यवंशी, प्रा.संजीव कांबळे, जीवन सूर्यवंशी, किरण कांबळे,उद्धव गायकवाड ,प्रमोद कांबळे ,दिलीप गायकवाड, सुरेश कांबळे ,जालिंदर कांबळे, कुशेंद्र सोनकांबळे , महाप्रजापती सोनकांबळे, सोनाली कांबळे, दत्तात्रय कोल्हे आदी परिश्रम घेत आहेत.


