उमरगा :- तालुक्यातील पेठ सांगवी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेच्या परीसरात दि. 12 रोजी विविध प्रकारच्या जातीच्या रोपांचे वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न झाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठसांगवी येथे दिनांक 12 जुलै रोजी मोरपंखी, अशोक, वड,करंज, बकुळ,सप्तपर्णी,स्कायफायटा,आंबा,चिंच अशा विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाला पेठसांगवी गावाचे उपसरपंच सिराज शेख,माजी सरपंच गणेश पाटील, पोलिस पाटील ईश्वर सुरवसे,ग्रा.पं.सदस्य गिरमल दलाल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटील, उपाध्यक्ष उमेश सुरवसे, सदस्य निळकंठ राठोड, रामचंद्र सुरवसे,शिवराज पाटील, सुलोचना सुरवसे, यशवंतराव चव्हाण विद्यालयचे मुख्याध्यापक उद्धव कोटे,आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिक्षक इब्राहिम चौधरी, सत्यपाल भंडारे, संतोष साखरे, शिक्षिका सुरेखा साळुंके, मायादेवी गायकवाड, जयश्री गोबाडे, साधना आळणे,शा.पो.आ.कर्मचारी सचिन गायकवाड,भाग्यश्री गायकवाड,नम्रता गायकवाड, ग्रामस्थ सुधाकर गायकवाड, तुळशीदास गायकवाड व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमुर्ती स्वामी यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका कल्पना गुंजोटे यांनी केले.


