उमरगा :- लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी या गावातून मौलाना आयुब यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरेबिया येथील उमराहच्या पवित्र धार्मिक यात्रेनिमित्त दि. 13 रोजी एक भावीकांचा जत्ता रवाना झाला. उमराहच्या पवित्र यात्रेसाठी रविवारी उजनी येथून एक गट रवाना झाला. यात्रेकरूंना पवित्र धार्मिक यात्रेवर पाठवण्यासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोहोचले होते.यात्रेकरूंनी देशात शांती आणि बंधुप्रेम नांदावे यासाठी प्रार्थना करून गावकऱ्यांचा निरोप घेतला.कुटुंबातील सदस्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी यात्रेकरूंना साश्रू नयनांनी निरोप दिला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती औसा चे माजी सभापती योगिराज पाटील यांच्या वतीने सर्व यात्रेकरूंचे शाल, फुलांचा हार घालून यात्रेसाठी शुभेच्छा देत निरोप देण्यात आला यावेळी उमरगा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अब्दुल रज्जाक, मजहरखा पठाण ग्रामपंचायत सदस्य, शफीक शेख,वजीर फकीर,युसूफ शेख आसिफ शेख यांच्या सह असंख्य समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


