उमरगा :- संभाजी ब्रिगेड चे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर दिनांक १३ जुलै २०२५ रोजी सोलापुर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ व कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणी करीता संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व विविध राजकीय पक्ष, समविचारी संघटना यांच्यावतीने उमरगा चे तहसीलदार गोविंद येरमे यांच्या मार्फत महाराष्ट्र चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दि.15 रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हंटले आहे की, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे काही समाजकंटक, दंगेखोर व जातीय तेढ पसरविणाऱ्या प्रवृत्तींनी संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अतिरेकी पद्धतीने शाही फेकून व इतर हिंसक माध्यमातून जीवघेणा हल्ला केला. सदर प्रकार केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर संपूर्ण विचारप्रवाहावर व राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर घातलेला आघात आहे.हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध असून, मागील काही काळात सामाजिक सलोखा बिघडविण्याच्या हेतूने अशा प्रकारचे हल्ले सातत्याने घडत आहेत. त्यामुळे यामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषी समाजकंटकांविरुद्ध तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच प्रकरणाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे सखोल चौकशी करण्यात यावी.अशी मागणी तहसीलदार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निवेदनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आण्णासाहेब पवार, शहर अध्यक्ष प्रदिप पाटील, मराठा सेवा संघाचे भूमिपुत्र वाघ, रिपब्लिकन पार्टी हरिश डावरे, वंचित बहुजन आघाडीचे राम गायकवाड, कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार, अपंग प्रहार क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष इसाक शेख, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे वैजनाथ काळे, शिवकांत पतगे, हणमंत सुरवसे,जिजाऊ ब्रिगेड प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार, विभागीय कार्याध्यक्ष सुनंदा माने, तालुकाध्यक्षा रजनी काळे, प्रीती जाधव, संभाजी ब्रिगेड महिला आघाडी शीतल भोसले,ॲड. एस.पी. इनामदार राजेंद्र माळी, प्रदीप पाटील, गौरीशंकर नाकेदार, नागेश स्वामी, अजय कांबळे, सुरज देशमुख, काशीनाथ पाटील, विजय पतगे, शंतनू सगर, अशोक मंमाळे, राहुल खराते, जनार्धन बिराजदार यांच्या स्वाक्षरी आहेत.


