उमरगा:- सुखी प्रेमी जीवनात तो.. च्या संशयाचा भूत शिरला रे…शिरला..की काही तरी घात होणार याची धोक्याची घंटा वाजण्यास सुरुवात होतेच आणि एक दिवस दुर्दैवी घटना घडण्याचा योग येतोच अस म्हंटल्यास वावग ठरणार नाही. अशीच एक घटना शहरातील पतंगे रोडवरील परीसरात घडली असून प्रियकरांने प्रियसीचा चारीत्र्यावर संशय घेत टोकाची भुमिका घेवुन गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली असून, घटना घडून 24 तासाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच उमरगा पोलीसांनी दमदार कामगीरी करत सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी यांच्याशी साधलेल्या संवादाच्या बळावर चाणाक्ष बुध्दीचा वापर करुन आरोपीस जेरबंद करण्यात यश प्राप्त केले.
सविस्तर वृत्त..दि. 13/07/2025 रोजी दुपारी 12:30 वा.चे सुमारास पो.स्टे. उमरगा येथे माहिती मिळाली की, पतंगे रोड उमरगा येथील मोमीन मस्जिद जवळ राहणारी महिला सौ माया रमेश शिंदे वय 45 वर्षे ही राहते घरी बेडवर मृतावस्थेत पडलेली असुन तिच्या गळ्यावर कशानेतरी गळा आवळल्याचे व्रण दिसत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ जावुन पंचनामा करून मयतेचे प्रेत उपजिल्हा रूग्णालय उमरगां येथे घेवुन जावुन वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन प्रेताचे पी.एम. करण्यात आले. त्यानंतर चौकशी मध्ये मोमीन मस्जिद जवळील सीसीटिव्ही फुटेज, आरोपीस घटनास्थळी जाताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकडे विचारपुस करून तपास केला असता सदर महिला माया रमेश शिंदे वय 45 वर्षे हिस तिचाच प्रियकर माधव पांडुरंग पाचंगे वय 44 वर्षे रा.हिप्परगाराव ता.उमरगा ह.मु. तुरोरी ता.उमरगा यांने अनैतिक संबंधातुन तिच्या चारीत्र्यावर संशय घेवुन गमजाने गळा आवळून खुन केला असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणात फिर्यादी रोहिणी दिपक पाटोळे वय 24 वर्ष रा. साईनगर सोसायटी मांजरी, पुणे जि. पुणे दि. 14/07/2025 रोजी पो.स्टे. हजर येवुन फिर्याद जबाब दिल्यावरून पो.स्टे. उमरगा गु.रं.न. 462/2025 कलम 103 (1) भा.न्या.स. 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असुन गुन्हयाचा तपास अश्विनी भोसले पोलीस निरीक्षक पो.स्टे. उमरगा हे करीत आहेत.तपासात गुन्हयातील निष्पन्न आरोपीचा सी.सी.टि.व्ही. फुटेज व मोबाईल टॉवर लोकेशनव्दारे शोध घेवुन त्यास पुणे येथुन ताब्यातुन घेवुन दि. 14/07/2025 रोजी रात्री अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीस दि 15/07/2025 रोजी मा. न्यायालय उमरगा यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयांनी नमुद आरोपीचे दि. 18/07/2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केला आहे. तपासात आरोपीने मयत महिलेचे चारीत्र्यावर संशय घेवुन तिच्यामुळेच त्याचे कौटुंबिक जीवन बरबाद झाल्याचा राग मनात धरून दि.12/07/2025 रोजी रात्री तिच्या घरी जावुन गमजाने तिचा गळा आवळुन खुन केल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हा घडल्यापासुन 24 तासाचे आत आरोपी निष्पन्न करून त्याचा शोध घेवुन त्यास जेरबंद करून उमरगा पोलीसांनी मोलाची व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.सदरची कामगिरी धाराशिव च्या पोलीस अधीक्षक रितु खोकेर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उमरगाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांचे मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाणे च्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सपोनि पांडुरंग कन्हेरे, पोउपनि गजानन पुजरवाड, पोहेकॉ चैतन्य कोनगुलवार, पोहेकॉ अतुल जाधव, पोहेकॉ वाल्मिक कोळी, पोहेकॉ शिवलिंग घोळसगांव पोना अनुरूद्र कावळे यांनी केलेली आहे.


