लोहारा शहरात सराफ दुकान फोडले, रोख रक्कमेसह 7 लाख 81 हजाराचे चांदिचे दागिने लंपास

0
74

लोहारा :– येथील श्री जय लक्ष्मी माऊली ज्वेलर्स चे दुकान फोडून 7 लाख 81 हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना दि.15- जुलै रोजी पहाटे घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोहारा शहरातील गजबजलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात श्री जय लक्ष्मी माऊली ज्वेलर्स दुकान आहे.या दुकानाचे मालक अविनाश माळी यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दि.15 जुलै रोजी दररोज प्रमाणे त्यांचे लहान बंधु श्रीनिवास फुलसुंदर हे रात्री सात वाजता दुकानाला व्यवस्थित कुलुप लावुन ते घरी आले.दररोज प्रमाणे रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही चेक करत होते.त्या मध्यरात्री पर्यंत सर्व व्यवस्थित होती. या अगोदरही लोहारा शहरात सोन्याचे दुकान फोडून चोरी सारखे प्रकार घडले आहेत.अद्याप चोर हाती लागलेला नाही. त्यामुळे सोने-चांदी विक्रेता युनियन यांच्यावतीने लोहारा येथे एक वॉचमन ठेवण्यात आलेला आहे.सर्व दुकानाकडे चकरा मारत रात्रभर पहारा देणे हे काम दिले आहे. वाचमन आलेले शिवलींग साखरे यांनी पाहाटे 3:39 वा. दुकाणदार च्या व्हाटसप ग्रुपवर दुकानाचा फोटो टाकल तेव्हा दुकाण सुव्यवस्थित होते.नंतर पहाटे 4 वाजून 10 मिनिटाने दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले असल्याचे श्रीनिवास फुलसुंर यांना फोन करून सांगितले.तेव्हा घटनास्थळी गेलो असता दुकाणाचे चॅनल गेटला असलेले आठही कुलूप तुटलेले दिसले चैनल गेटच्या अतील शटर एका बाजूने उचलेले दिसले याबाबत पोलीस स्टेशन लाकळवली असता पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी आले दुकाणाच्या आत जावून पाहणी केली असता. चोरट्यांनी दुकानात लावलेला सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर काढुन हार्ड डिक्स काढण्याशाठी बॉक्सला छेडछाड केल्याचे दिसले.तसेच शोकेस व कॉउंटर मध्ये ठेवलेले चांदीचे तयार दागीणे चैन 500 ग्राम, जोडवे 1 किलो, चांदी ताट वाटी 2 किलो, ब्रास्लेट १ किलो,चांदी लेडीज अंगठ्या 500 ग्राम व मोडीसाठी आलेले चांदीचे जुने दागीणे चैन, वाळे, जोडवे, करदोडे असे 3 किलो तसेच रोख रक्कम 40 हजार रु. असे एकुण 8 किलो चांदीचे दागीणे व रोख रक्कम 40 हजार रुपये चोरुन नेल्याचे अढळुन आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान, धाराशिव येथील श्वानपथक, ठसे तज्ज्ञ पथकास पाचारण करण्यात आले. परंतु चोरट्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवला नाही. त्यामुळे शोध लागू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here