भारतीय जनता पार्टी उमरगा तालुक्याची ग्रामीण कार्यकारिणी घोषित

0
58

उमरगा :- भाजपा तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने यांनी दि.16 जुलै रोजी जिल्हा आणि तालुक्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने  भारतीय जनता पार्टी उमरगा तालुका (ग्रामीण) ची कार्यकारणी घोषित केली. या कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्ष म्हणून मोहीत चालुक्य, कालिदास भोसले, गणेश पाटील, गोदावरी साखरे, सोनम कांबळे, बापूराव पाटील यांची तर तालुका सरचिटणीस पदावर विठ्ठल चिकुंद्रे यांना पुन्हा संधी देत सुशीलकुमार शिंदे, आष्टा ज, लोकेश बिराजदार, आलुर यांची निवड करण्यात आली. तालुका चिटणीसपदी अजय वाले, स्वस्तिक कलशेट्टी, गोविंद पाटील, रोहिणी मंडले, सरिता पवार, बाळासाहेब माने, शत्रुघ्न बिराजदार यांची निवड करण्यात आली कोष्याध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील सोबतीला खंडेराया बनसोडे यांची निवड करण्यात आली. यात पाच महिलासह पंचेचाळीस सदस्यांची जंबो कार्यकारिणी घोषित करण्यात आली. महिला मोर्च्याच्या अध्यक्षपदी पूजा माणिकवार, तुरोरी, भाजयुमोच्या तालुकाध्यक्ष पदी उमाजी मंडले, मुरळी, किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून दिलीप सुरवसे, यांची तर माजी जि प सदस्य रफिक तांबोळी यांची अल्पसंख्याक मोर्च्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली पेठसांगवीचे अमर यमगर यांना ओबीसी मोर्चा अध्यक्ष पदाचा मान मिळाला. वैजीनाथ सूर्यवंशी कोरेगाव यांना एस सी मोर्चा, एस टी मोर्चा अध्यक्षपदी अनुक्रमे वैजीनाथ सूर्यवंशी आणि शिवाजी कुकुरडे यांना मान मिळाला. विविध सात विविध आघाडी आणि चार सेलसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने यांनी अतिशय नियोजन रित्या तगडी कार्यकारिणी घोषित केली.सर्व घटकांना समाविष्ट करीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक जि प गटातील कार्यकर्त्याना समान न्याय आणि अधिकार देण्याचा प्रयत्न कार्यकारणीच्या माध्यमातून केला , नूतन पदाधिकारी बंधू-भगिनीच अभिनंदन तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने यांनी केले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here