उमरगा :- धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शन खाली संपूर्ण जिल्ह्यात दि. 19 जुलै रोजी 15 लक्ष वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करण्यात आला असून, या अंतर्गत उमरगा नगरपरिषद कार्यालय च्यावतीने विविध प्रकारच्या 22 जातीच्या 19800 रोपाच्या वृक्षाची लागवड दि.19 जुलै रोजी सकाळी 7.00 वाजता करण्यात येणार असून हा मियावाकी घनजंगल लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्या करीता लोकचळवळ गरजेची असून, शहरवासीयांनी या करीता आपल्या जीवनातील अनमोल क्षण या समाज उपयोगी कार्याकरीता वेळ देवून सहकार्य करावे असे आवाहन नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशान्वये दि.19 जुलै 2025 रोजी “हरित धाराशिव” या विशेष उपक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यात एकूण 15 लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.या उपक्रमाअंतर्गत नगरपरिषद उमरगा हद्दीतील बीज गुणांक केंद्र, उमरगा येथे 60 गुंठे क्षेत्रामध्ये एकूण 18,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून
मुख्याधिकारी यांच्या सह नगरपरिषद चे कृष्णा काळे,महेश शिंदे, राजन वाघमारे, मनोज जंगले, प्रसाद माळी,गणेश पुरी, मुसा मुबारक, आरुणा कोडगावे,प्रशांत वारभुवन, विशाल माळी, ईरफान शेख, रमेश हजारे, विकास दनाने, शेषेराव भोसले, मंजुर शेख, बाळु माने,अनुप राऊत, माधव नागराळे, व्यकंट क्षिरसागर, सलीम सास्तुरे, मौलाली जमादार,उध्दव कांबळे, राम सुरेश सुरवसे,कर्ण बुध्दिवंत गरुड,मोहसीन खाजाभाई मुंगले,मुकेश महावीर पाटील,अनिकेत कांबळे,असलम शेख,यलप्पा दंडगुले,आकाश सरपे,सतिश कांबळे,रमेश शिंदे,बाळु गायकवाड,गुरुनाथ कांबळे,रोहीत सुरवसे,लखण चव्हाण,अंबिका माने,लखन आबाचणे,ओंकार रणदिवे,ऋषिकेश सरपे,शिवानंद सुर्यवंशी,आरती जाधव,समित्रा क्षिरसागर,रुपेश लोकरे,साधना सरपे,रोहित दुनगे,अमर कांबळे,शाहीद शेख,दिपक धोत्रे. आदी सर्व अधिकारी कर्मचारी परीश्रम घेत आहेत. या व्यापक वृक्षारोपण उपक्रमात शहरातील प्रत्येक नागरीकांचा, लहान मोठ्यांचा, सामाजिक संस्थाचा,सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, पत्रकार यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सक्रिय सहभाग आवश्यक आहे.या उपक्रमात शासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था महात्मा बसवेश्वर शाळा,जिल्हा परिषदप्राथमिक शाळा,मलंग विद्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय,यांचा, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, वृक्षप्रेमी, स्वयंसेवक संघटना, एन.जी.ओ. तसेच इतर सर्व सामाजिक घटक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून वृक्ष लागवडीत सहभाग नोंदविणार आहेत.सर्वांनी या सामूहिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक आणि हरित उमरगा घडवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी केले आहे.


