शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन बांधकामाची माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांची पणन मंत्री यांच्याकडे मागणी

0
65

लोहारा :–  शिरूर अनंतपाळ कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत नाफेड हमी भाव खरेदी केंद्र चालू करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच बाजार समितीच्या आवारात शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमारजी रावल यांना पत्राद्वारे करुन विनंती केली. यावर मंत्री महोदयांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बाजार समितीचे सभापती गोविंद चिलकुरे, भाजपा तालुकाध्यक्ष माधव बिरादार, गणेश  खरटमोल, सतीश भिक्का आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here