उमरगा नगरपरिषद च्यावतीने 18125 वृक्षाच्या रोपाची लागवड; 940 जणांचा सहभाग

0
161

उमरगा :– महाराष्ट्र  शासन व जिल्हा प्रशासन यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत एका दिवसात १५ लक्ष वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने कीर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा नगरपरिषद हद्दीतील बीज गुणांक केंद्र, उमरगा येथे 60 गुंठे क्षेत्रामध्ये 18 हजार झाडे लावण्याचा संकल्प केला होता.  दि.१९. जुलै रोजी सकाळी ७.०० वाजता शहरातील शिवपुरी रोडवरील बीज गुणांक केंद्र परिसरात घन वन पद्धतीने 22 प्रजातीच्या 18125  वृक्षाच्या रोपाची लागवड करण्यात आली.

 

यावेळी  आमदार प्रविण स्वामी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीत चे संचालक सचिन जाधव, माजी नगरसेवक विक्रम म्हस्के, डाॅ.पोफळे, डाॅ.सातपुते,निसर्ग प्रेमी ग्रुपचे सर्व पदाधिकारी ,नगरपरिषद चे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, लेखापाल कृष्णा काळे, सहाय्यक लेखापाल मनोज जंगले, शहर अभियंता राजन वाघमारे, कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी, पाणी पुरवठा अभियंता गणेश पुरी,कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी मुसा मुबारक,प्रशासकीय अधिकारी आरुणा कोडगावे, अभियंता प्रशांत वारभुवन,वरिष्ठ लिपिक विशाल माळी,प्रशासकीय अधिकारी ईरफान शेख, रमेश हजारे,स्वच्छता निरीक्षक विकास दनाने, शेषेराव भोसले,यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिशिष्ठीत नागरिक, यांच्यासह सर्व स्तरावरील नागरीक उपस्थित होते. या   अभियानाच्या यशस्वीते   करिता  मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्या सह उमरगा नगर परिषदेचे कर्मचारी विविध सामाजिक संस्था ,शैक्षणिक संस्थाचे  पदाधिकारी मलंग विद्यालय,जि.प.प्रा.शाळा,महात्मा बसवेश्वर शाळा, माधवी चालुक्य कन्या प्रशाला,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय चे विद्यार्थी विद्यार्थींनी तसेच माहिला बचतगट व त्यांचे पदाधिकारी  शहरातील विविध सामाजिक संस्था,राजकीय पक्ष,शैक्षणिक संस्थाचे  पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक  यानी उपक्रमात सह्भाग घेतला.  या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here