उमरगा : उमरगा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा निवडी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा .सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते दि .१९ रोजी करण्यात आल्या . यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, लोहारा तालुका अध्यक्ष सुनिल साळुंखे, उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी , युवक जिल्हा सरचिटणीस शमशोद्दीन जमादार, युवती राष्ट्रवादी शहराध्यक्ष साधना सलगरे (पाटील ) यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी राऊताई संजय पाटील ( भोसले ) , उमरगा तालुका कार्याध्यक्षपदी गोजरताई मारोती बनसोडे, उमरगा शहराध्यक्षपदी मीरा चव्हाण (भोसले ) , उमरगा शहर उपाध्यक्षपदी अर्चना सगर, तालुका सचिव पदी सुनीता सूर्यवंशी, युवती शहर उपाध्यक्षपदी पूजा मनोज हावळे आदींच्या निवडीची घोषणा करण्यात आली . प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते सर्वांना पक्ष चिन्ह देवुन सन्मान करण्यात आला . यावेळी युवक शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण, अभय पाटील, सुरज भोसले, मुरली पाटील, मनोज देशपांडे, बालाजी सातपुते , आसीफ शिलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते .


