उमरगा :– रोटरी ही मैत्रीसह व मानवसेवेसाठी कार्य करित असुन मोठया प्रमाणात सामाजीक कार्य करण्यासाठी लोकसहभाची गरज असल्याचे मत रोटरीचे भावी प्रांतपाल क्षितिज झावरे यांनी व्यक्त केले.उमरगा रोटरी क्लबचे (सन २०२५-२६) च्या नुतन अध्यक्ष धनंजय मेनकुदळे यांची तर सचिवपदी राजु जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवारी (ता. १८) रोजी श्री मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. त्यावेळी क्षितिज झावरे (अहिल्यानगर) हे बोलत होते. यावेळी सहाय्यक प्रांतपाल पी.के.मुंढे, रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दिपक पोफळे, श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सचिव रामकृष्ण खरोसेकर, प्राचार्य डॉ. राम सोलंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.डॉ. दिपक पोफळे यांनी आपण आपल्या दैनंदीन जिवनातील व्यापातुन आनंदी राहण्याचे मंत्र विषद केले. नूतन अध्यक्ष धनंजय मेनकुदळे यांनी आपल्या काळात करण्यात येणारे सामजिक, शैक्षणिक व पर्यावरण यासाठी भरीव कार्य करणार असल्याचे सांगितले. रोटरीच्या पदग्रहण सोहळ्यास माजी प्राचार्य डॉ दिलीप गरुड , उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. कोमल जाधव,प्रा.शौकत पटेल, प्रशांत कुलकर्णी, प्राचार्य डॉ. संजय अस्वले, डॉ सुचेता पोफळे, कविता अस्वले, कमलाकर भोसले, डॉ निलेश महामुनी, डॉ. राजकुमार कानडे, शमिम पठाण, अमर परळकर, मनीष सोनी, प्रा. युसुफ मुल्ला, प्रा. विनोद देवरकर, अजित अष्टे , मुरूम रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी व त्यांचे क्लब चे अनेक सदस्य , धाराशिव रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजित रणदिवे , कलशेट्टी पाटील, अनिल मदनसुरे , शिवकुमार दळवी , शिवशंकर वंडरे यांच्यासह श्रमजीवी शिक्षण संस्थेतील प्राध्यापक , कर्मचारी उमरगा शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे रोटरी चे माजी अध्यक्ष सतीश साळुंके यांनी प्रास्ताविक केले. संजय ढोणे, परमेश्वर सुतार यांनी सुत्रसंचलन केले तर राजु जोशी यांनी आभार मानले.


